कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : रामा धोंडीबा तेले,
कैदी क्र. सी. 266 यांचा जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे असताना दिनांक 28
सप्टेंबर 2018 रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी
इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणाला काही माहिती, पुरावा, तक्रार
नोंदवायची, द्यायची असेल त्यांनी दिनांक 7 डिसेंबर पर्यंत अथवा त्यापूर्वी समक्ष
आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत,असे उपविभागीय दंडाधिकारी यांनी
कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.