कोल्हापूर दि. 23 : जिल्ह्यात दि.26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून संविधान दिनानिमित्त
शालेय विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत शहारातील विविध शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थी विद्यार्थीनीं सहभागी होणार आहेत.
दसरा चौक येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा येथून शालेय विद्यार्थीच्या संविधान रॅलीचा प्रारंभ होणार आहेत.
रॅलीचा शुभारंभ महापौर सुरमंजिरी
लाटकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. संविधान रॅली दसरा चौक, अयोध्या टॉकीज (लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन चौक) मार्गे बिंदु चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका
आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, खासदार, आमदार,
यांच्यासह मान्यवर नागरीक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात येवून उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
याबरोबरच जिल्हा परिषद कोल्हापूर,
सर्व तालुक्यांच्या पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक /माध्यमिक
शाळा, सर्व अनुदानित शाळा येथेही संविधान दिन साजरा करण्यात येणार येत असल्याची माहिती
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे
दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.