लोकशाही दिनात
26 तक्रार अर्ज दाखल
कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 4 : आजच्या लोकशाही दिनात 26 तक्रार
अर्ज दाखल झाले. यामध्ये
जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल)-13, क्रिडा अधिकारी कार्यालय-1, अग्रणी बँक-2, नगर
भूमापन-1, अधिक्षक भूमीअभिलेख-2, मुख्य पोस्ट ऑफिस-1, सार्वजनिक बांधकाम विभाग-1,
जिल्हा परिषद-1, जिल्हा निबंधक-3, महानगर पालिका-1 अशा एकूण 26 तक्रार अर्जांचा
सामावेश आहे. अशी माहिती करमणूक तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.
0000
पंचनामा झाला नसल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ माहिती
द्यावी
--- जिल्हाधिकारी
दौलत देसाई
कोल्हापूर,
(जि.मा.का.) दि. 4 : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व
फळपिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसल्यास त्यांनी
त्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
ऑक्टोबर, 2019 मध्ये झालेल्या अवकाळी
पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीपीक व फळपिकांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व
कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना
कळविण्यात येते, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा झालेला नाही, त्यांनी आपल्या
गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना त्याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध करुन
द्यावी. त्यांच्या शेतपिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील.
0000
गोव्याचे
कला व सास्कृतिक मंत्री गोविंद गावडे कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 4 : गोव्याचे कला व सास्कृतिक मंत्री
गोविंद गावडे हे बुधवार दि. 6 नोव्हेंबर ते शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर पर्यंत कोल्हापूर
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार
दि. 6 व 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या मराठी नाटकात
भाग घेण्यासाठी ते कोल्हापूर येथे थांबणार आहेत. त्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांची
भूमिका साकारणार आहेत. दि. 8 नोव्हेबर रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापुरहून गोव्याकडे
प्रयाण.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.