शिक्षक पात्रता (TET)
परीक्षा-2019 साठी
ऑन लाईन अर्ज भरण्यास सुरुवात
कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 7 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) परीक्षा-2019 चे आयोजन
करण्यात आले असून, ही परीक्षा रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे,
अशी माहिती जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.
या
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑन लाईन पद्धतीने भरावे. अधिक
माहितीसाठी https://mahatet.in या संकेत स्थळावर भेट देवून, अर्ज भरणे, परीक्षा
शुल्क, परीक्षेची वेळ आदी माहिती देण्यात आली आहे. ऑन लाईन अर्ज व शुल्क भरण्याचा
कालावधी दि. 8 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2019 अशी आहे, तरी जिल्ह्यातील डी.एड,
बी.एड उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
सैन्य भरती दरम्यान पैशाची
मागणी करणाऱ्या दलाल
किंवा मध्यस्थी व्यक्ती
विरोधात पोलिस स्टेशमध्ये तक्रार करा
-जिल्हाधिकारी
दौलत देसाई
कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 7 : भारतीय सैन्य दलामार्फत रत्नागिरी
जिल्ह्यात दि. 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी
माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
भारतीय सैन्य भरती ही पारदर्शक
स्वरुपाची असून, या भरती दरम्यान कुठलाही दलाल किंवा मध्यस्थी व्यक्ती भारतीय सैन्य
दलामध्ये भरती करु शकत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एकादा दलाल किंवा
मध्यस्थी व्यक्ती उमेदवारांकडून सैन्य भरतीसाठी पैसे अगर इतर वस्तुंची मागणी करत
असेल, तर आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात यावी, अधिक माहितीसाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.