शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

28 नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक



          कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : कोल्हापूर एनसीसी गट मुख्यालयाच्यावतीने येत्या 28 नोव्हेंबरपासून पन्हाळा ते विशाळगड असा छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक  सुरु होणार असून यामध्ये देशातील तसेच अन्य देशातूनही एनसीसी छात्र सहभागी होणार आहेत.
 छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक  हा राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग कॅम्प असून यामध्ये देशभरातील एनसीसी छात्रांबरोबरच अन्य देशातील छात्रांचाही सहभाग असणार आहे. दिनांक 28,29,30 नोव्हेंबर  आणि 1 डिसेंबर 2019 अशा चार बॅचेसमध्ये छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक  आयोजित केला आहे.  छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक  साठी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील आर्मीतील तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक हे नाव पन्हाळा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पूनीत झालेल्या भूमीत सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये ट्रेकिंग केल्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारशाची झलक छात्रांना मिळते. एनसीसी छात्रांना येथील मराठा इतिहास, स्थानिक चालीरिती आणि संस्कृतीची देखील माहिती मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.