शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

चंद्रपूरच्या हर्षल ग्रामीण विकास संस्थेला माहिती देवू नये जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांचे आवाहन



कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : हर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था, चंद्रपूर यांच्या अधिकृत प्रतिनिधींना यापुढे माहिती उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी भू.वि. देशपांडे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यात विविध अधिनियमांखाली नोंदणीकृत झालेल्या आस्थापनांची व्यवसाय नोंदणीकृत झालेल्या आस्थापनांची व्यवसाय नोंदवही तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून पहिल्या टप्प्यात कंपनी कायदा 1956, कारखाने अधिनियम 1948, दुकाने व वाणिज्यिक आस्थापना अधिनियम 1948, संस्था नोंदणी कायदा 1860, सहाकारी संस्था कायदा 1960, खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्राच्या अखत्यारितील अस्थापना या सात अधिनियम, कायद्याखाली नोंदणीकृत आस्थापनांचे संगणीकीकरण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात या संगणीकृत यादीची प्रत्यक्ष आस्थापनांना भेटीव्दारे पडताळणी करण्यात येणार होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या क्षेत्रीय कामासाठी हर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था, चंद्रपुर यांची ई-निविदेव्दारे नेमणुक केली असून या संस्थेमार्फत नजिकच्या काळात प्रत्यक्ष आस्थापना भेटीव्दारे यादीची पडताळणी करणार असल्याने पडताळणी अंतर्गत संबंधित आस्थापनेचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क दूरध्वनी, ई-मेल, पॅन व टॅन क्र. आर्थिक कार्यालयाचा तपशिल, आस्थापनामध्ये काम करणाऱ्यांची संख्या इ. माहिती गोळा करण्याबाबत नमुद अधिनियम कायद्याखाली नोंदणीकृत सर्व आस्थापनाना भेट देणाऱ्या हर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था, चंद्रपूर यांच्या अधिकृत प्रतिनिधींना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ते सहकार्य करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते.
संस्थेच्या असलेल्या निविदा करारानुसार या हर्षल ग्रामीण विकास बहु, संस्था चंद्रपुर यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी केलेले काम समाधानकारक नसल्याचे आढळून आल्याने सहसंचालक प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी संस्थेच्या कामास स्थगिती दिली आहे. त्या अनुषंगाने हर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था, चंद्रपुर यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी माहितीचा गैरवापर करू नये व भविष्यात संबंधित आस्थापनांना त्रास होऊ नये या दृष्टिने हर्षल ग्रामीण विकास बहु. संस्था चंद्रपुर यांच्या प्रतिनिधींना यापुढे माहिती उपलब्ध करून देण्यात येऊ नये.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.