गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

वर्ल्ड हेरिटेज सप्ताह निमित्त हेरिटेज व संस्कृतीवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन - जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोल्हापूर, दि. 14 (जि.मा.का):  वर्ल्ड हेरिटेज सप्ताह निमित्त 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूरची हेरिटेज ठिकाणी तसेच संस्कृती लोकांसमोर आणून कोल्हापूरच्या हेरिटेजचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, हेरिटेज कॉझरवेशन कमिटी, क्रीडाई, रोटरी, इस्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स आदी संस्थांच्या सहकार्याने   19 ते 25 नोव्हेंबर 2019  या कालावधीत वर्ल्ड हेरिटेज सप्ताह निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अमरजा निबांळकर, क्रीडाचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवि माने आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड हेरिटेज सप्ताहमध्ये  आयोजित करण्यात येणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, जिल्ह्यातील 12 तालुक्यातील हेरिटेज तसेच वैशिष्ट्ये, संस्कृती यांच्या माहितीचे जिल्हाधिकारी कार्यालयात बोर्ड लावण्यात येणार असून त्यासाठी ग्रामीण भागातील वैशिष्ट्यावर आधारित स्पर्धा, हेरिटेज वास्तूबाबत फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शन, जिल्ह्याची पारंपारिक पाककृती, खाद्यसंस्कृतीवर आधारित फूडफेस्टीवल याबरोबरच 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा सत्कार तसेच या सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धातील विजेत्याना पारितोषिके तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.