मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

अनाथ, निराधार मुलांसाठी आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव - महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर



        कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : महिला बाल विकास विभागांतर्गत शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन मुलांचे निरीक्षणगृह, बाल कल्याण संकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे दिनांक 20 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर यांनी दिली आहे.
          महिला बाल विकास विभागांतर्गत शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. अशा मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
          यावेळी जिल्ह्यातील शासकीय स्वयंसेवी संस्थांमधील मुले तसेच स्थानिक शाळांमधील मुले उपस्थित राहणार असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही श्री. काटकर यांनी सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.