कोल्हापूर,
दि. 13 (जि.मा.का.): मुली
व महिलांची छेडछाड रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकाची कामगिरी अधिक
परिणामकारक करण्यासाठी निर्भया पथकास आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करुन दिली असून महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 बरोबरच पोलीस
उपविभागांसाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांवर मुली व महिलांच्या छेडछाडीच्या
तक्रारी संदर्भात कॉल करावेत अथवा व्हॉटस्ॲपवर संदेश पाठवावा, असे आवाहन पोलीस
अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
मुलींमध्ये तसेच
महिलांमध्ये, शाळा-कॉलेज परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 6 निर्भया पथके
कार्यरत असून अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
निर्भया पथकाचे कामकाज चालते. प्रत्येक निर्भया पथकामध्ये एक पोलीस उप निरीक्षक
दर्जाचे अधिकारी व 5 कर्मचारी कार्यरत आहेत. निर्भया पथकास मोबाईल फोन, छुपे
कॅमेरे व चार चाकी वाहने देण्यात आली आहे. शाळा, कॉलेज येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे
आयोजन करून छेडछाड करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबरोबरच होणारी छेडछाड छुप्या
कॅमेऱ्यामध्ये चित्रीत करणे व स्वत:हून कारवाईवर भर देण्याकरीता पथकास एक
ॲन्ड्राईड मोबाईल सिमकार्डसह देण्यात आला आहे.
महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 बरोबरच जिल्ह्यात कार्यरत निर्भया पथके, त्यांचे मोबाईल
क्रमांक व पोलीस ठाणे हद्द खालीलप्रमाणे असून काही तक्रारी असल्यास संबधित पोलीस
ठाणे हद्दीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
1) शहर विभाग
निर्भया पथक - मोबाईल क्रमांक 9405380133 असून यामध्ये लक्ष्मीपूरी , शाहुपूरी, राजवाडा व राजारामपुरी
पोलीस ठाणे हद्दीचा समावेश आहे.
2) करवीर विभाग
निर्भया पथक - 9404190133 असून यामध्ये करवीर,
मुरगूड, इस्फूर्ली, कागल, गांधीनगर, गोकुळ शिरगांव, एम.आय.डी.सी. शिरोली पोलीस
ठाणे हद्दीचा समावेश आहे.
3) इचलकरंजी
विभाग निर्भया पथक - 9405350133 यामध्ये इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापुर, कुरूंदवाड व
हुपरी पोलीस ठाणे हद्दीचा समावेश आहे.
4) जयसिंगपूर
विभाग निर्भया पथक - 9405016133 यामध्ये जयसिंगपूर, वडगांव, हातकणंगले व शिरोळ
पोलीस ठाणे हद्दीचा समावेश आहे.
5) गडहिंग्लज विभाग निर्भया पथक - 9404912133 यामध्ये
आजरा, चंदगड, गडहिंग्लज, नेसरी, भुदरगड व गगनबावडा पोलीस ठाणे हद्दीचा समावेश आहे.
6) शाहूवाडी
विभाग निर्भया पथक - 9403956033 यामध्ये शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, कळे व
कोडोली पोलीस ठाणे हद्दीचा समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.