कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 1 : पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान वर्ग
करण्यास असमर्थता दाखविणाऱ्या शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील खाते बंद
करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. शासकीय योजनांचे लाभ
लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांमधील सर्व शासकीय खाती
बंद करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज
शिरोळ तहसिल कार्यालय येथे पूरग्रस्तबाधितांना मदत वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे असणाऱ्या खात्यावरुन पूरबाधित कुटुंबांना विविध प्रकारचे
सानुग्रह अनुदान ब्लक ट्रान्स्फरद्वारे संबंधिताच्या खात्यावर वर्ग करण्यास
असमर्थता दर्शविल्याचे निदर्शनास आले. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, शिरोळ येथे
पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या सर्व रक्कमांचा बाधित कुटुंबांच्या खात्यावर
जमा झाल्याबाबत ताळमेळ घेवून हे खाते बंद करावे, असे आदेश श्री. देसाई यांनी दिले.
हे
अनुदान पूरबाधित कुटुंबांना तात्काळ मिळण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती
निवारणार्थ मिळालेले सर्व अनुदान बँक ऑफ इंडिया शाखा जयसिंगपूर येथे खाते उघडण्यास
परवानगी दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या या सूचनेनुसार निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी तात्काळ तसे पत्र तहसिलदार शिरोळ यांना
पाठविले आहे. अशा प्रकारे शासकीय योजनांचे
लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांमधील
सर्व शासकीय खाती बंद करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला
आहे.
00 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.