कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 6
: जिल्हाधिकारी कार्यालय व 12 तहसिलदार कार्यालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा
स्थापन करायची आहे. यासाठी इच्छूकांनी 11 नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज विहित
नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले
आहे.
ही
सुविधा स्थापन करण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नेमायची आहे. या तांत्रिक
सल्लागार संस्थेस व्हिडीओ कॉन्फरन्स संदर्भातील कार्यालयीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या
तांत्रिक बाबी लक्षात घेवून निविदा प्रसिध्द करण्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्स स्थापन
करून कॉन्फरन्स चालू होईपर्यंतचे सर्व कामकाज दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी
नेमणूक करायची आहे. सल्लागार संस्थेस एकत्रित मानधनाची अंदाजीत रक्कम 1 लाख 50
हजार रूपये इतकी तरतूद केली आहे.
तांत्रिक
सल्लागार संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज विहित
नमुन्यात निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या नावे दिनांक 11 नोव्हेंबर
पूर्वी सादर करावेत. अर्जामध्ये खालील बाबींचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. अर्ज
तांत्रिक व वित्तीय अशा दोन स्वतंत्र लिफाफ्यामध्ये सादर करावेत.
तांत्रिक
लिफाफा- संस्था नोंदणीकृत असावी व संस्थेकडे विषयांकीत बाबीचे किमान 2 तज्ञ
सल्लागार असावेत. सल्लागार संस्थेकडे कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
तसेच त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक. वैयक्तिक अर्जदार या कामासाठी पात्र
असणार नाहीत. संस्थेकडील तज्ञ मनुष्यबळाच्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता बीई,
बीटेक, एमसीए व समकक्ष असणे आवश्यक आहे. वरील नमुद केलेले कामकाज दोन महिन्यात
पूर्ण करण्यास तयार असल्याचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.
वित्तीय
लिफाफा- यामध्ये संस्थेने काम करण्याचे दरपत्रक द्यावे.
वरील
दोन्ही लिफाफ्यांपैकी तांत्रिक लिफाफा प्रथम उघडला जाईल व पात्र संस्थेचा वित्तीय
दरपत्रकाचा लिफाफा उघडून, लघुत्तम निविदाकारास या कामासाठी सल्लागार संस्था म्हणून
नेमण्यात येईल. तांत्रिक सल्लागार संस्थेचा नेमणूकीबाबतचा अंतिम निर्णय
जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.