मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

जिल्हास्तरीय शांतता समितीची शाहू स्मारक येथे आज बैठक



कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता श्री शाहू स्मारक येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने आणि रामजन्मभूमी बाबरी मस्जिद जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता व सुव्यवस्थेबाबत या बैठकीत मार्गदर्शन होणार आहे.
       जिल्ह्यातील सर्व शांतता समितीचे सदस्य, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
          येणारा ईद-ए-मिलाद सण व रामजन्मभूमी बाबरी मस्जिद जागेच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक एकोपा अखंडीत रहावा. समाजामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, करवीर,गांधीनगर, गोकुळ शिरगाव व एमआयडीसी शिरोली या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शांतता समिती सदस्य,नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.