शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

गडहिंग्लज शहरात शांतता प्रिय एकता रॅलीचे आयोजन



गडहिंग्लज शहरात शांतता प्रिय एकता रॅलीचे आयोजन
                कोल्हापूर, (जिमाका) दि. 9 : आयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मस्जिद याच्या निकालाबाबत गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्यावतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांनी दिली.
        गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्यावतीने शांतता कमिटी, मौहल्ला कमिटी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, सर्व तरुण मंडळे, महिला दक्षता व गडहिंग्लज नगराध्यक्ष, नगरसेवक, बजरंग दल, आर.एस.एस., हिंदू जनजागृती व सनातन यांची शांतता बैठक घेण्यात आली. राम मंदिर व बाबरी मस्जिद याबाबतचा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालय देईल, तो सर्वसामान्य जनतेने मान्य करावा. निकालानंतर कोणीही फटाके, गुलाल साखर, पेढे वाटू नयेत. मोटार सायकल पुंगळी काढून गाडी फिरवू नये. सर्व समाजाने न्यायालयाच्या निकालाचा आदर करीत शांतता राखावी. असे या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. जाधवर यांनी सांगितले.
          सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत पोलिस परेड ग्राऊंड येथून दसरा चौक, प्रांत कार्यालय, रजनीगंधा चौक, लक्ष्मी चौक, नेहरु चौक, बाजार पेठ, वीरशैव चौक, सुन्नी मस्जिद, संकेश्वर रोड, मुसळे तिकटी, प्रांत कार्यालय ते शिवाजी पुतळा दसरा चौक अशी पायी एकता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्‍ये सर्व समाजातील बांधव व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. गडहिंग्लज शहर हे चांगले शहर आहे. येथे जाती, धर्म भेदभाव केला जात नाही. सर्व समाज एकोप्याने राहत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, गडहिंग्लज शहरकर व तालुका या निर्णयाचा आदर करीत, शांतता व सलोखा राखण्यात येत आहे. असे मत नगराध्यक्ष स्वाती महेश कोरी यांनी व्यक्त केले.
          गडहिंग्लज सुन्नी मुस्लिम समाजाचे प्रमुख असफाक मकानदार यांनीही आम्ही मा. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करीत, सर्व हिंदू-मुस्लिम, जाती-धर्म गुण्या गोविंदाने राहत आहोत. आमचे कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, शांतता राखण्यात येत आहे, असे आस्वासीत केले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांनी गडहिंग्लज शहर हे शांतता प्रिय शहर असून, मा. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करावा, असे सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याबाबत आवाहन केले.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.