विधानसभा
निवडणूक
मयत
सर्जेराव भोसलेंच्या वारसांना 15 लाख सुपूर्त
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर,दि.13 (जि.मा.का): विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजावत
असतांना ह्दयविकाराच्या तीव्र धक्याने निधन पावलेले अध्यापक सर्जेराव तुकाराम भोसले
यांच्या पत्नी शशिकला भोसले यांच्याकडे 15 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी आज त्यांच्या गावी जाऊन सुपूर्द केला.
विधानसभा निवडणूक-2019 निमित्त 275-करवीर विधानसभा मतदारसंघात
मतदान अधिकारी क्र. 1 म्हणून कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील रहिवाशी असलेल्या सर्जेराव
तुकाराम भोसले, अध्यापक यांची मतदान केंद्र क्र. 21 पोहाळे तर्फे बोरगाव विद्यामंदिर
या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी नेमणुकीच्या
ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य
केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती जास्त अत्यवस्थ् वाटू
लागल्याने तात्काळ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सायंकाळी 4 वाजता पुढील उपचारासाठी
हलविण्यात आले. मात्र सायंकाळी 4.30 वाजता ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे
निधन झाले.
निवडणूक कर्तव्य बजावत असताना निधन झालेल्या सर्जेराव भोसले
यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूरीबाबतचा प्रस्ताव त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाच्यावतीने
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला
निवडणूक आयोगाकडून मंजूरी प्राप्त झाली असून मयत सर्जेराव भोसले यांच्या पत्नी शशिकला
सर्जेराव भोसले यांना आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 15 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
केला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.