कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 5 : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जुना राजवाडा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याला पोलीस
स्टेशन ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर
पोलीस ठाणे, करवीर पोलीस ठाण्यामधील पोलीसांना ‘विशेष पुरस्कार’, स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखा, करवीर पोलीस ठाणे यांना ‘बेस्ट डिटेक्शन’ आणि मुख्यालयातील
पोलीसांना ‘बहिर्जी नाईक’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.
पोलीस
मुख्यालयातील परिषद समागृहात मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस
अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित
केले. संपूर्ण महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यास
प्रशिस्तीपत्र व रोख रक्कम अशा स्वरुपातील
पोलीस स्टेशन ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात येतो. ऑगस्ट व सप्टेंबर
महिन्यासाठी जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि इस्पुर्ली पोलीस
ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला.
उघडकीस
न आलेल्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्यास विशेष पुरस्कार देण्यात येतो. स्थानिक गुन्हे
शाखेकडील पोलीस हे.कॉ. राजेश आनंदराव आडुळकर, पो.ना. रामचंद्र शामराव कोळी, सायबर
पोलीस ठाण्याकडील अमित सर्जे, करवीर पोलीस ठाण्यामधील पो.हे.कॉ. प्रशांत सदाशिव
माने, पो. कॉ. युक्ती राजेंद्र ठोंबरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उघडकीस
न आलेल्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्यास बहिर्जी नाईक हा पुरस्कार देण्यात येतो.
मुख्यालयातील पो.ना. तुकाराम दत्तात्रय राजिगरे, पो. कॉ. आसिफ महमद कलायगार आणि
पो. हे.कॉ. इक्बाल गुलाब महात यांना देण्यात आला. 10 सप्टेंबर 2019 रोजी आरोपी
शुभम शांताराम शिंदे (रा.अर्जुनवाड, ता. गडहिंग्लज) अदिनाथ तुकाराम बडेकर (रा. बीड
खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड) या दोघांना कागल महामार्गावरील कणेरीफाटा येथे
पकडून त्यांच्याकडील चार गावठी बनावटीचे पिस्तुल, सात राऊंड व इतर साहित्य असा
मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करुन वरील
आरोपींचा साथीदार शर्मेश रोहिदास राठोड (रा. कामोठे, नवी मुंबई) यास अटक केली व
त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व
चार राऊंड जप्त केले होते.
जोतिबा
डोंगराच्या परिसरात मोटर सायकलवरुन जाणाऱ्या स्त्री पुरुषांना निर्जन स्थळी अडवून
त्यांना चाकूचा धाक दाखवून आणि माराहाण करुन दानिग्यासह किमती ऐवज काढून घेणाऱ्या
टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस
निरीक्षक संतोष पवार, पो. हे.कॉ, राजेश आडुळकर, पो.हे.कॉ. सचिन पाटील. पो.कॉ.
सुरेश पाटील, रवींद्र कांबळे, पो.ना. सायबर पोलीस ठाण्यामधील अमर वासुदेव, कोडोली
पोलीस ठाण्याचे हिंदुराव केसरे यांनी जेरबंद केले होते. या पथकास सप्टेंबर 2019 चा
बेस्ट डिटेक्शन पुरस्कार देण्यात आला.
करवीर
तसेच इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक करुन त्यांच्याकडून
एकूण 11 घरफोड्या उघडकीस आणून 5 लाख 92 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
करणारे करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक विवेकानंद
राळेभात, हवालदार प्रशांत माने, राजू जरळी, पो.ना. दीपक घोरपडे, गुरुप्रसाद
झांबरे, सुहास पाटील, पो. कॉ. युक्ती ठोंबरे, पो.कॉ. राचमंद्र माळी आणि सचिन
बेंडखळे यांना ऑक्टोबर महिन्याकरिताचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार देण्यात आला.
बैठकीमध्ये
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी
मार्गदर्शन करुन प्रलंबित गुन्हे, प्रतिबंधात्मक कार्यवाही येवू घातलेल्या ईद ए
मिलाद च्या अनुषंगाने आढावा घेतला. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती
काकडे, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस
अधीक्षक श्रीनिवास घाडगे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी
अधिकारी उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.