कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार
दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एस.
मुंडासे यांनी दिली.
भरती मेळाव्यासाठी उमेदवार आयटीआय
उत्तीर्ण असावा. मेळाव्याचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना मोठ्या आस्थापनेत,
कारखान्यात ॲप्रेन्टीसशीप करण्याची सुवर्णसंधी, प्रशिक्षण कालावधीत नियमानुसार 7
ते 10 हजार रूपयापर्यंत विद्यावेतन, प्रशिक्षण कालावधीनंतर NCVT हे आंतरराष्ट्रीय
दर्जाचे प्रमाणपत्र, मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवाराची थेट भरती केली जाणार आहे.
मेळाव्यात ॲप्रेन्टीसशीप योजनेबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन व ॲप्रेटिंसशीप पोर्टलबाबत
मार्गदर्शन केले जाणार आहे. कोल्हापूर व परिसरातील अनेक आस्थापनामधून मोठ्या
प्रमाणात ॲप्रेन्टीसशीपची भरती केली जाणार असून याचा आयटीआय पास प्रशिक्षणार्थींनी
लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मुंडासे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.