शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी योगदान द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई







कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा 25 नोव्हेंबर पर्यंत तंबाखूमुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       संपूर्ण जगात भावी पिढी व्यसनांच्या अधिन होत असताना कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग हे सलाम मुंबई फौंडेशन तसेच सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंच तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात अभियान राबवित आहेत.  सर्व बालकांवर व्यसनविरोधी संस्कार निर्माण करणे ही काळाची गरज आहे. राज्यात शिक्षण विभागाने निर्धारीत केलेल्या 11 निकषानुसार सर्वंच शाळा तंबाखूमुक्त झाल्यास विद्यार्थ्यांव्दारे पालकही व्यसनमुक्त होण्यास मदत होईल.
          11 निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची माहिती तसेच छायाचित्र सलाम मुंबई फौंडेशनच्या तंबाखूमुक्त शाळा ॲपमध्ये अपलोड करावी आणि आपला जिल्हा 100 टक्के तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले.
तंबाखूमुक्त शाळेसाठीचे 11 निकष
          •मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढावी, याची एक प्रत प्रवेश व्दारावर अथवा दर्शनी स्थळी लावावी.
          • शाळेत नियंत्रण समितीची स्थापना करावी.
          • धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे असे पक्के फलक महत्वाच्या ठिकाणी लावणे.
          • तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती याबाबत पोस्टर्स, घोषणापट्टया आणि नियम लावणे.
            तंबाखूविरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहीणे. पोस्टर्स, घोषणापट्टया आणि नियम विद्यार्थ्यांकडून तयार करून घ्यावेत.
            तंबाखू नियंत्रण कायदा 2003 आणि अद्यादेश यांची प्रत कार्यालयात ठेवावी.
          • तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिनिधी यांची तंबाखूमुक्त शाळेसाठी पत्र लिहून मदत घेणे.
            वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावून शाळेत मुख तपासणी, आरोग्य तपासणी आयोजित करावी.
          • शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असा फलक प्रवेश व्दाराजवळ लावावा.
         

          • तंबाखू नियंत्रणासाठी हिरीरीने कार्य करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी यांना प्रमाणपत्र, भेटकार्ड, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.
            वरील सर्व निकष पूर्ण झाल्यावर प्रवेश व्दाराजवळ तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावावा.
 महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र रत्न प्रमाणपत्र वितरण
          तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात उत्‍कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र रत्न आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्याहस्ते आज या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्य समन्वयक अजय पिळणकर आणि जिल्हा समन्वयक संजय ठाणगे उपस्थित होते. जिल्ह्यातील 31 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांना ही प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत.
63 जणांकडून 36 हजार 70 रूपयांचा दंड वसूल
          राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 7 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार  डॉ. सुरेश घोलप, समुपदेशक चारूशिला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्याने शासकीय कार्यालयातील 7 कर्मचारी अशा एकूण 63 व्यक्तींवर कार्यवाही करून 36 हजार 70 रूपयांचा दंड वसूल केला.
00000
      
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.