शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक




कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एस. खेमनार, शासकीय आयटीआयचे प्राचार्य डॉ. रविंद्र सी. मुंडासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत आर पट्टलवार, जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी व कार्यरत पब्लिक नोटरी अधिकारी यांची अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी पदी जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दौलत देसाई यांनी नेमणूक केली आहे.
अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांनी करावयाची  कामे याप्रमाणे- पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी करण्यासाठी प्राप्त  होणाऱ्या अर्जासोबत विद्यापीठ किंवा संबंधित संस्था यांनी दिलेले मूळ पदवीची छायांकित प्रत प्रमाणित करणे. या प्रतीवर Verified with Origional and found Correct किंवा Verified with Origional and Found not Correct_Rejected असा शेरा नमूद करणे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.