सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

टपाल खात्यातील रिक्त पदांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा - प्रवर अधिक्षक ईश्वर पाटील



कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का) :  टपाल खात्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील रिक्त ग्रामीण डाक सेवकांच्या जागा ऑनलाईन भरती प्रक्रियेव्दारे भरण्यात येणार असून पात्र व इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, प्रवर अधिकक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.
वरील पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याबबतच्या नियम  व अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज करतानाच्या नियम व अटींसाठी http://appost.in/gdsonline या वेब साईटवर लॉग इन करावे. अर्ज करणाऱ्या खुल्या व इतर मागास वर्गातील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज शुल्क 100 रूपये असून यामध्ये ते त्यांच्या पसंतीच्या 5 रिक्त जागांकरीता अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांनी नजिकच्या प्रधान डाकघराशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील उमेदवारांसाठी कोल्हापूर, कोल्हापूर शहर व इचलकरंजी प्रधान डाकघर येथे फी स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, जमाती व सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी काहीही शुल्क आकारले जाणार नाही व त्या कितीही रिक्त जागांकरीता अर्ज करू शकतील. अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच करायचे आहेत. इतर कुठल्याही पध्दतीने केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
इच्छूकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. एखादा उमेदवार गुणानुक्रमे एकापेक्षा अधिक रिक्त जागांवर जरी प्रथमस्थानी राहिला तरी त्याला केवळ एकाच पदावर निवडले जाईल. निवड झालेल्या उमेदवारास त्याच्या निवडीबाबतची माहिती एसएमएस, ई-मेलव्दारे दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही कारणास्तव एसएमएस, ई-मेल न मिळाल्यास त्यास भारतीय डाक विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.