गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

प्रशिक्षण संस्थांना 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत जुन्या कोणत्याही प्रशिक्षण संस्थेची फी प्रलंबित राहू नये याकरीता संस्थाचालकांनी उपलब्ध असलेल्या कागदपत्रासह दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत आपले फी मागणी प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पांडूरंग गिऱ्हे यांनी केले आहे.
       साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई अंतर्गत कोल्हापूर जिल्हा कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण योजनेंतर्गत सन 2003-04 ते सन 2005-06 या वित्तीय वर्षात देण्यात आलेल्या विविध प्रशिक्षण संस्थांना प्रलंबित फी वितरण करावयाची कार्यवाही सुरू आहे. प्रशिक्षण योजना 15 वर्षापासून बंद असल्याने व नवीन धोरण निश्चित करून योजना पुन्हा कार्यान्वीत करण्याची प्रक्रीया सुरू असून जुन्या कोणत्याही प्रशिक्षण संस्थेची फी प्रलंबित राहू नये यासाठी दिनांक  30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. 30 नोव्हेंबर नंतर आलेले प्रस्ताव, मागणी, तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची संस्थाचालकांनी नोंद घ्यावी, असेही श्री. गिऱ्हे यांनी स्पष्ट केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.