बुधवार, ८ जानेवारी, २०२०

ई-आर 1 विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत भरावे



        कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र, सरकार व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/ व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, खासगी क्षेत्रातील ज्यांच्याकडे 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना उद्योग, व्यापार व्यवसाय कारखाने यांनी त्यांच्याकडील रिक्त जागांच्या माहितीचे विवरणपत्र ई-आर 1 31 जानेवारीपर्यंत सेवायोजन कार्यालयांना सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी केले आहे.
        31 जानेवारीपर्यंत माहिती न दिल्यास बडगा उगारला जाणार आहे. रिक्तपदांची सूचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 माहे डिसेंबर 2019 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत (31 जानेवारीपर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. नियोक्त्यांच्या लॉग इनमध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा आहे. याप्रमाणे नियोक्त्यांना डिसेंबर 2019 या तिमाहीचे विवरणपत्र, ई आर-1 सादर करता येणार आहे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईटवर ओपन करून एम्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लीक करून लॉग इनमध्ये युजर आयडी पासवर्ड वापरून लॉगइन करून ई आर रिपोर्टमधील ई आर-1 या ऑप्शनवर क्लीक करून ऑनलाईन माहिती सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा माहितीसाठी सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्टया वगळून) सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी 0231- 2545677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.