कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : रंकाळा
बस स्टॅण्डच्या मागील शिवनेरी अर्पाटमेंट, यात्री निवासच्या दारात रिक्षामध्ये अनधिकृतपणे
गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल जप्त करून
संबधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी
माधवी शिंदे यांनी दिली.
शिवाजी पेठेत रंकाळा बस स्टॅण्डच्या मागील शिवनेरी
अर्पाटमेंट, यात्री निवासच्या दारात रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करून
देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी
शिंदे यांनी पुरवठा निरीक्षक काशिनाथ पालकर, सुरेश टिपुगडे, बबन घोडके, सतिश
शिंदे, आदम नायकवडी आदि सहकाऱ्यासमवेत काल सकाळी छापा टाकून रिक्षामध्ये
अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल जप्त केला.
या घटनेची फिर्याद पुरवठा निरीक्षक के.आर.पालकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात देऊन
गुन्हा नोंद केला आहे.
या छाप्यात जप्त
मुद्देमालामध्ये अडीच हजार रूपये किंमतीचे एच.पी. गॅस सिलेंडर टाकी, 3 हजार किंमतीचा
शार्प कंपनीचा वजनकाटा, 4 हजार 500 किंमतीचे गॅस भरणीचे मोटारगन एका बाजूस नॉब व
एका बाजूला हाय प्रेशर रेग्युलेटर पाईपला जोडलेली, 35 हजार किमंतीची तीन चाकी
रिक्षा नं. MH09-J-2671 बाबत काळा पिवळा
पट्टा असलेली रिक्षाही जप्त केली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.