कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने पोलीस उन्नत
दिवस (रेझिंग डे) २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत
विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२० रोजी पोलीस परेड मैदान
येथे महिला, मुली व विद्यार्थींनीसाठी रस्सीखेच (टग ऑप वॉर), आत्मसंरक्षण
प्रशिक्षण, सायबर सुरक्षा विषयक माहिती, पोवाडा, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले
असल्याचे कोल्हापूर पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
2 जानेवारी
1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा सध्याचा ध्वज हा तात्कालीन पंतप्रधान मा. पंडीत
जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलीस दलास हस्तांतरित केला असून हा दिवस संपुर्ण
राज्यात पोलीस उन्नत दिवस (रेझिंग डे) म्हणून साजरा करण्यात येतो. रेझिंग डे निम्मत
२ ते ५ जानेवारी या कालावधीत 1)
पोलीस पाटील व खाजगी सुरक्षा संस्था यांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले. 2) सरकारतर्फे साक्ष दिलेल्या साक्षीदारांचा सत्कार 3) किंमती मुद्देमाल
संबधीतांना मा. न्यायालयाचे आदेशाने परत आदा करणेबाबत जिल्हास्तरीय विशेष मोहीमेचे
आयोजन केले. 4) शाळेय विद्यार्थांकरीता नियंत्रण कक्ष, सेफसिटी, पोलीस मुख्यालय
भेट, शस्त्रप्रदर्शन, ट्राफिक गार्डन भेट असे कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हा पोलीस दल व निर्भया पथकाच्यावतीने पोलीस
मैदान येथे, मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता
कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रमात उत्स्फूर्त
प्रतिसाद घेणाऱ्या महीला,मुली,विद्यार्थीनी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात
येणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हामध्ये विविध कार्यक्षेत्रात वेगळ्या कामाचा ठसा
उमठवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून कार्याक्रमास जिल्हयातील मान्यवर
महिला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांनतर पोलीस परेड मैदान ते धैर्यप्रसाद चौक
या मार्गावर रॅली काढणेत येणार असून, रॅलीमध्ये मुलींचे लेझीम पथक, झांज पथक, ढोलपथक सहभागी होणार आहे.
रेझिंग डे
निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व महीला, मुली विद्यार्थीनी मोठया
प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.