शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

जिल्हास्तरीय लघु उद्योग पुरस्काराचे पालकमंत्र्याचे हस्ते रविवारी वितरण




कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) :  लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या  उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हास्तरावरील पुरस्कार देण्यात येत असून सन 2019 या वर्षीच्या पुरस्कारचे वितरण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवार, 26 जानेवारी 2020  रोजी  शिवाजी स्टेडीयम येथे होणार आहे.
 जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार श्री.संजय दिनकर माळी, मे.फायरफ्लाय फायर पंप्स प्रा.लि.प्लॉट नं.सी-6 7,एमआयडीसी,गोकूळ शिरगाव याना तर द्वितीय पुरस्कार (विभागून): श्री.तानाजीराव बापूसाहेब पाटील, श्री.तानाजी, श्रीपती सावर्डेकर, मे.यशश्री    पॉली एक्स्ट्रजन लि.मे.यश रेफ्रिजरेशन गट नं.436 छ.शाहू इंड. इस्टेट,प्लॉट नं.202, कणेरीवाडी, ता.करवीर यांना जाहीर झाला आहे.प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारचे स्वरुप रुपये 15000 तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरुप  रुपये 10000/- सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र, शाल व श्रीफळ असे आहे.
राष्ट्रीय पुरस्काराप्रमाणेच जिल्हा पुरस्कार यशस्वी उद्योजक निवडीसाठी निकष असून यामध्ये नोंदणीकृत लघुउद्योग घटकांची मागील तीन वर्षातील स्थिर भांडवल गुंतवणूक, रोजगार निमिर्ती नफयातील वाढ विचारात घेतली जाते. उत्पादनासाठी वापरलेले तंत्रज्ञान, गुणवत्ता प्राप्त उत्पादन, मशिनरी बिल्डींग मेन्टेनन्स, कामगार कल्याणासाठीच्या योजना यांचा विचार करुन आणि उद्योग घटक थकबाकीत येत नाही याची खात्री वित्तीय संस्थेकडून केली जाते. जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे उपसमितीत या बाबींची सुक्ष्म छाननी करुन घटकांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर मुल्यांकन करुन यशस्वी उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड केली जाते, असे जिल्हा उद्योग विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.