कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : महा-रेशीम अभियान 2020 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यास यंदा
200 एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महा-रेशीम
रथाचा उपक्रम सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त
केला.
महा-रेशीम अभियान 2020 अंतर्गत तुती
लागवडीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा तुती लागवडीमध्ये अधिक सहभाग
घेण्यासाठी रेशीम विकास कार्यालयाच्यावतीने आजपासून सुरू होणाऱ्या महा-रेशीम
अभियानांतर्गत महा-रेशीम रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यावेळी रेशीम सल्लागार समिती सदस्य डॉ.
ए.डी. जाधव, रेशीम विकास अधिकारी एस.एस. शिंदे, मनरेगा प्रकल्प अधिकारी श्री. पवार,
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी.एम. खंडागळे व क्षेत्र सहाय्यक जे.आर.मोरे, वाय.ए.
पाटील, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
महा-रेशीम अभियानांतर्गत आजपासून 21
जानेवारीअखेर आयोजित केलेला महा-रेशीम अभियान रथ गडहिंग्लज समूहांतर्गत शेंद्री,
इंचनाळ, कडगांव, कुमरी, हल्लारवाडी, करवीर
समुहांतर्गत म्हाळूंगे, कोतोली, आरळे, बेले, भूये व हातकणंगले समुहांतर्गत नरंदे,
मिणचे, कुंभोज, वाठार (बुवाचे), खोची, दूर्गेवाडी या गावात फिरवण्यात येणार आहे.
या रथामार्फत या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण
कागदपत्रासह नोंदणी करावी. नंतर ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने अभियान कालावधीत
जे लाभार्थी नोंदणी करतील असे लाभार्थी सन 2020-21 सालाकरीता मनरेगा योजनेंतर्गत
शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. सदरच्या नोंदणीच्या कार्यक्रमासाठी समूहनिहाय/
ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला असून त्या ग्रामपंचायत अंतर्गत्
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या समन्वयातून ग्रामस्तरापर्यंत योजनेची
जनजागृती करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2,
जिल्हा रेशीम कार्यालय, 564 ई-वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपूरी, कोल्हापूर येथे
दूरध्वनी क्र. 0231-2654403 व reshimkolhapur@gmail.com या ई-मेल वर संपर्क करावा,
असे आवाहनही रेशीम विकास अधिकारी एस.एस. शिंदे यांनी केली आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.