कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील रेशीम उद्योग करु
इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महा रेशीम अभियानाअंतर्गत दि. 7 ते 21 जानेवारीअखेर आपली
नोंदणी करावी.
या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी सन 2020-21 साठी 200
एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला आहे. या लक्षांकाची पूर्तता होण्यासाठी
महारेशीम अभियान रथ गडहिंग्लज समूहांतर्गत शेंद्री, इंचनाळ, मिणचे, कुंभोज, वाठार
(बुवाचे), खोची, दूर्गेवाडी या गावात फिरवण्यात येणार आहे. सन 2020-21 साठी नवीन
लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
नोंदणी करण्याकरिता जमिनीचा 7/12 उतारा
ऑनलाईन. जमिनीचा 8 अ उतारा. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्डची छायांकित प्रत, ओळखपत्र
आकारातील 2 छायाचित्रे, चतु:सीमा / टोच नकाशा, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,
आवश्यकतेनुसार जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका छायांकित
प्रत, मोबाईल क्र., मनरेगा अंतर्गत जॉब कार्डची छायांकित प्रत, ग्रामसभा ठराव, तलाठ्याकडील
अल्पभूधारक दाखला या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
मनरेगा अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणीकरिता एका
गावामध्ये किमान 25 ते 30 लाभार्थी नोंदणी आवश्यक. प्रथम प्राधान्य समुहाअंतर्गतच्या लाभार्थ्यांना
राहील. मनरेगा अंतर्गत एका कुटूंबास एक एकरपर्यंत लाभ दिला जाईल. मनरेगा
व्यतिरिक्त लागवड करणाऱ्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार सर्व रेशीम उद्योगाचे
कामकाज वैयक्तिकरित्या करावे लागणार आहे. अभियान कालावधीमध्ये 7 ते 21 जानेवारी या
कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी लागेल, त्यानंतर शासन प्रणाली बंद होणार असल्याने सन
2020-21 ची नोंदणी बंद राहील याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी
श्रेणी-2, जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2654403 व
reshimkolhapur@gmail.com या ई-मेल वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.