शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

थेट अभिकर्ता पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज करा



       कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : कोल्हापूर डाक विभागामार्फत टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमाकरीता थेट अभिकर्ता पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.
        टपाल जीवन विमा थेट अभिकर्त्यासाठी पात्रता - वयोमर्यादा कमीतकमी 18 वर्षे व जास्तीत-जास्त 60 वर्षे. मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून 10 वी, 12 उत्तीर्ण. आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपनन कुशलता असणे आवश्यक. बेरोजगार/स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार / कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक/ अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समुह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा करीता थेट अभिकर्तासाठी आवेदन करू शकता. जो उमेदवार थेट अभिकर्तासाठी निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन/ प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीव्दारे टपाल जीवन विमा/ ग्रामीण टपाल जीवन विम्याचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर रहावे लागेल. परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरीता 250 रूपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रूपये फी जमा करावी लागेल. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला 5 हजार रूपये टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र /किसान विकास पत्र मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील. थेट अभिकर्ता म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 या पत्त्यावर दि. 20 जानेवारीपूर्वी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजाच्या सत्यप्रतीसोबत पाठवावे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.