कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का.) : शिरोळ
तालुक्यातील दानोळी परिसरात राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांनी संयुक्तपणे अवैध
गावठी दारु निर्मितीवर आज छापे घातले. छाप्यामध्ये 6 गुन्हे नोंद केले असून लोखंडी पिंप 11,
प्लास्टिक पिंप 13, होज पाईप 8, सिंटेक्स टाक्या 5 प्लास्टिक पिशव्या 82, गावठी
920 लि व कच्चे रसायन 8950 लि असा एकूण 3 लाख 2 हजार 120 किंमतीचा मुद्देमाल जप्त
करुन नाश करण्यात आला. शासकीय कामात अडथळा केल्याने एकावर 353 अन्वये जयसिंगपूर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विभागीय उपायुक्त वाय.एम. पवार, जिल्हा अधीक्षक गणेश
पाटील व उपाधीक्षक बापुसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे
निरीक्षक डी.एस.बोरिगिड्डे, राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाचे निरीक्षक
पी.आर.पाटील, निरीक्षक संभाजी बरगे, संजय साळवी, श्री. मत्ते, जे.जी. जाधव, राजन
साळोखे यांच्यासह दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, जगन्नाथ पाटील, अतुल पाटील,
स्वप्नाली पाटील, के.बी.नडे, अभिनंदन कांबळे, पी.सी. शेलार, दत्तात्रय लाडके,
सहायक दुय्यम निरीक्षक गणपती हजारे, सहायक फौजदार श्री. नाईक व पोलीस स्टाफ तसेच
जवान यांनी ही कारवाई केली.
शिरोळ तालुक्यात अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य
निर्मिती साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करुन अशाप्रकारची
मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.