शनिवार, १८ जानेवारी, २०२०

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण




 कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी कळविले आहे.
श्री छत्रपती शाहू स्टेडियम (छ. शिवाजी स्टेडियमच्या पूर्वेकडील स्टेडियम) कोल्हापूर येथे होणाऱ्या  ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी केले आहे.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.