कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणामार्फत काल महानगरपालिकेच्या भाऊसो रावसाहेब महागावकर विद्यामंदिर शाळा
क्र. 7 येथे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती
व्ही.व्ही. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव
पंकज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घन कचरा स्वच्छ अभियान संपन्न झाले.
यावेळी महागावकर शाळेचे सहदेव
शिंदे यांनी प्राधिकरणाच्या उपस्थितांचे स्वागत केले. तसेच प्राधिकरणाचे अधिक्षक
सुनील मिठारी यांनी विद्यार्थ्यांना घन कचरा म्हणजे काय तसेच घन कचऱ्यामुळे
निसर्गावर होणारे परिणाम आणि आपल्या आरोग्याला त्याचा कसा धोका आहे याविषयी योग्य
मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना घन कचरा स्वच्छ अभियान पत्रकांचे वाटप
करण्यात आले. अभियानास मुख्याध्यापक दत्तात्रय डांगरे, वैशाली पाटील, श्रीमती
धदवाड, इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अनिकेत
मोहिते यांनी केले. विधी स्वयंसेवक सीमा डिंगने व
फ्रान्सिस्का डिसोझा यांनी आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.