गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाहू स्मारक येथे शनिवारी कार्यक्रम



कोल्हापूर, दि. 23 (जिमाका)  :  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम  सकाळी 9.30 वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित केला आहे.
              राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सतिश धुमाळ आणि उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.