सोमवार, ६ जानेवारी, २०२०

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी 7 तारखेपर्यंत धान्याची उचल करावी - तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ


        कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक/ लाभार्थी यांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला तसेच 7 ते 15 तारखेपर्यंत धान्याची संबंधित रास्त भाव धान्य दुकानातून उचल करावी, असे आवाहन शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.
        शिरोळ तालुक्यामध्ये अंत्योदय 4642व प्राधान्य गटातील 55169 इतके पात्र शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना धान्याचे वाटप करण्यासाठी  संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपूर्वी धान्य पोहोच करण्यात येते. शासनाकडून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेस अन्नदिन व 7 ते 15 तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा करण्यात येतो. या अन्नदिन व अन्न सप्ताहाचा उद्देश साध्य होण्यासाठी व जास्तीत-जास्त पात्र लाभार्थींना त्याचा लाभ होण्यासाठी लाभार्थ्यांनी 7 तारखेपर्यंत धान्याची उचल करावी.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.