कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : एसबीआय बँकेमार्फत सुरक्षा रक्षक
(बँक गार्डस) या पदासाठी माजी सैनिकांची नावे मागविलेली आहेत. इच्छूक माजी
सैनिकांनी दि. 4 जानेवारीपर्यंत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले.
जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या
इच्छूक माजी सैनिकांनी जे निवृत्ती वेतनधारक आहेत व जे माजी सैनिक खालील पात्रता
पूर्ण करत आहेत. त्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे प्रत्यक्ष येवून
दिनांक 4 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. येताना स्वत:चा मोबाईल नंबर,
डिसचार्ज पुस्तक, ओळख पत्र घेवून यावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर
सुभाष सासने यांनी केले आहे.
शारीरिक व शैक्षणिक पात्रता उमेदवाराची दि. 31 ऑक्टोंबर 2019 रोजी वयाची 45 वर्ष पूर्ण
झालेली नसावी. उमेदवार कमीत-कमी 8 वी पास पण पदवीधर नसावा. कमीत- कमी 15 वर्षे
सैन्यसेवा झालेली असावी. जास्तीत-जास्त हवालदार आणि त्या खालील हुद्दा असावा. अधिक
माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.