बुधवार, १५ जानेवारी, २०२०

59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा सांस्कृतिक राज्यमंत्र्यांच्या हस्ते इचलकरंजीत आज उद्घाटन



       कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन आज श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते सायं. 7 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे यांनी दिली.
       कार्यक्रमास आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष अलकाताई स्वामी, रंगभूमीवरील दिग्गज मान्यवर तसेच परीक्षक बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदीप ओक, सुधीर ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत.
          स्पर्धेत मुंबई, गोवा, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, अकोला, लातूर, नागपूर, नांदेड या जिल्ह्यातील आणि गोवा राज्यातील तब्बल 26 संगीत नाटके इचलकरंजीकरांना बघता येणार आहेत. या स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी 10 व 15 रू. इतक्या  अल्प दराची तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. तिकीट विक्रीतील 50 टक्के हिस्सा हा सादरकर्त्या संस्थांना देण्यात येणार आहे.
          या संगीत नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.