कोल्हापूर, दि. 21 :
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी
राष्ट्रीय मतदार दिनाच्या मुख्य कार्यक्रमाबरोबरच सकाळी बिंदू चौकातून
रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नागरिकांनी तसेच मतदारांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी केले.
राष्ट्रीय मतदार
दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी कोल्हापूर
शहरातून मतदार जागृती रॅली काढण्यात येणार असून यामध्ये एनसीसी, एनएसएस, महिला बचत
गट व विद्यार्थी- विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. ही रॅली सकाळी 8.30 वाजता
बिंदू चौक येथून काढण्यात येणार असून पुढे शिवाजी पुतळा, महानगरपालिकामार्गे दसरा
चौक येथे येईल.
राष्ट्रीय मतदार
दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 10 वाजता
शाहू स्मारक भवन येथे आयोजित केला आहे. या दिवशी पथनाट्य, पोवाडा आयोजित करण्यात
आला आहे. या कार्यक्रमात मतदार जनजागृती व मतदान प्रक्रियेबाबत विविध विषयांवर
आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना प्रमाणपत्र व
सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. तसेच नवमतदार, 99 वर्षे पूर्ण झालेले
मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,
डाटा एंट्री ऑपरेटर यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या
दिवशी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्याने नांव नोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी यांच्या मार्फत समारंभपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. तरी नव्याने नाव
नोंदणी केलेल्या मतदारांनी दि. 25 जानेवारी रोजी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित
रहावे. या कार्यक्रमामध्ये सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे
आवाहनही श्री. धुमाळ यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.