शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर



कोल्हापूर,दि. 17 (जि.मा.का.):  भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमामध्ये पूर्वतयारी अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सर्व मतदारांची BLO Hybrid प्रणालीव्दारे किंवा विहित नमुना क्रमांक I ते IVB व्दारे सर्व मतदारांची पडताळणी करणार आहेत. या पडताळणीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करणे, वगळणी, दुरुस्ती व स्थानांतर देखील करण्यात येणार आहे.
मतदारांना आपल्या नावाचा तपशील मतदार यादीमध्ये अचूक असल्याबाबत पडताळणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा NVSP प्रणालीवर किंवा Voter Helpline ॲप किंवा CSC केंद्र किंवा Voter Help केंद्र यांच्याकडे माहितीचा पुरावा सादर करुन दिनांक 13 फेब्रुवारी, 2020 अखेर पडताळणी करायची आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2020 व 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावरील पात्र मतदारांची व सद्या अस्तित्वात असलेल्या केंद्राची माहिती देखील संकलित केली जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे खालील अर्ज भरुन द्यावयाचे आहेत :-    नमुना क्रमांक 6 (मतदार यादीत नाव सामाविष्ट करावयासाठी अर्ज).    नमुना क्रमांक 7 (मतदार यादीतील नावाची वगळणी करावयासाठी अर्ज).   नमुना क्रमांक 8 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज).   नमुना क्रमांक 8 अ (एकाच मतदार संघात मतदार यादीच्या नोंदीचे स्थानांतर करावयासाठी अर्ज)
 मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे वरील नमुने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://www.nvsp.in/ या प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी देखील प्रत्येक मतदार संघामध्ये मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता यांची नियुक्ती करुन सहकार्य करावे, असे आवाहनही उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.