कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2019-20 अंतर्गत संरक्षित
शेती घटकांतर्गत शेडनेट व वैयक्तिक
अस्तरीकरण या बाबींसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसाचे आत इच्छुक
शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि
विकास योजना सन 2019-20 अंतर्गत शेडनेट व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकाची
हॉर्टनेट प्रणालीवर घटकनिहाय व उपघटकनिहाय अर्जांची प्रतिक्षा यादी संपली आहे.
सद्यस्थितीत सदर घटकांचा लक्षांक जिल्हास्तरावर शिल्लक आहे.
या अनुषंगाने संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट व
वैयक्तिक अस्तरीकरण या बाबींसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसाचे आत
इच्छुक शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावेत.
लक्षांकापेक्षा जादाचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी
मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.