शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

पणजी येथे आज सायकल रॅली



      कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का.) : संपूर्ण देशभरात फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत उद्या दि. 18 जानेवारी रोजी पणजी येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांमार्फत रॅलीमध्ये 100 युवक व युवती सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नेहरु युवा केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.
    या उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री किरण रेजुजी व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. 5 हजार सायकलस्वारांसह पणजी येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 100 सायकलस्वारांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री. घाटावळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्याशी 0231-2548999 या दूरध्वनी क्रमांकावर साधावा.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.