कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : ध्वनीक्षेपक
व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष
यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत
जिल्ह्यामध्ये वापर करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत
क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीवर्धक / ध्वनीक्षेपक
लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.
शिवजयंती (शासकीय) 1 दिवस,
शिवजयंती (पारंपारिक) 1 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, दहीहंडी
(गोपाळकाला)1 दिवस, गणपती उत्सव/ मोहरम गणेशोत्सव 5 दिवस (सहावा,आठवा, नववा, दहावा
व अकरावा दिवस) मोहरम नववा दिवस (खत्तलरात्र) (टिप- दि. 29/8/2020 हा गणेशोत्सवाचा
आठवा दिवस व मोहरमचा - नववा दिवस एकच आहे.) नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी) 2
दिवस, दिवाळी (लक्ष्मीपूजन) 1 दिवस, ख्रिसमस 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व उर्वरित
1 दिवस आवश्यतेनुसार महत्वाच्या कार्यक्रमासाठी सुट घोषीत करण्यात येत आहे.
0 0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.