कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सामाजिक
वनीकरण विभागाच्यावतीने गेल्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 23
लाख 8 हजार रोपांची लागवड केली होती, यापैकी ऑक्टोंबर 2019 अखेर जिवंतरोपांची
सरासरी टक्केवारी 85 टक्के इतकी असून लागवड
केलेल्या रोपांची वाढ 3 ते 6 फुटापर्यंत असल्याचे स्पष्टीकरण सामाजिक
वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सन 2019 च्या पावसाळ्यामध्ये
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्ष लागवड
कार्यक्रम केवळ कागदावरच राबवल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. त्यास अनुसरून
सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी वस्तूस्थिती
स्पष्ट केली आहे. जिल्ह्यास 22 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले
होते. मात्र या विभागाने 23.08 लाख रोपांची 31 जुलै 2019 अखेर लागवड केली.
ऑक्टोंबर 2019 अखेर जीवंत रोपांची सरासरी टक्केवारी 85 टक्के इतकी असून लागवड केलेल्या रोपांची वाढ 3 ते 6 फुटापर्यंत झालेली
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.