मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

पेट्रोलियम कर्मचारी संघटनांना संपावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी



        कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या विविध कर्मचारी युनियन यांनी खाजगीकरणाच्या विरोधात दिनांक 8 व दिनांक 9 जानेवारी 2020 रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र एलपीजी पेट्रोल, पेट्रोल-डिझेल, केरोसिन आदि पेट्रोलियम उत्पादनाना जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 लागू होत असल्याने शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी कर्मचारी संघटनांना संपावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
            भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन(रिफायनरी ) एम्प्लॉईज युनियन, पेट्रोलियम वर्कमन्स युनियन, भारत पेट्रोलियम टेक्नीकल ॲण्ड नॉन टेक्नीकल एम्पॉयर्स असोसिएशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रोसेस टेक्नीशयन्स ॲण्ड ॲनालिस्ट युनियन, पेट्रोलियम एम्पॉईज युनियन, भारत पेट्रोलियम कर्मचारी युनियन यांनी खाजगीकरणाच्या विरोधात दिनांक 8 जानेवारी 2020 व दिनांक 9 जानेवारी 2020 रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास राज्यातील एल.पी.जी., पेट्रोल, डिझेल, केरोसिन सारख्या पेट्रोलजन्य पदार्थांचा वितरणावर विपरित परिणाम होऊन सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता आहे. उक्त संघटनांना संपावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रतिबंधात्मक आदेश केला आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.