रविवार, १२ जानेवारी, २०२०

जयसिंगपूर पोलीस ठाणे चोरीप्रकरणी संशयिताची माहिती हाती -पोलीस निरीक्षक डी एस बोरिगिड्डे



कोल्हापूर, दि. १२ (जिमाका)- सी सी टी व्ही फुटेजमधील संयशिताची माहिती मिळाली असल्याची माहिती जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक डी एस बोरिगिड्डे यांनी आज दिली.
            जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूने अज्ञाताने प्रवेश करुन मुद्देमाल कक्षातील २ लाख ३१ हजार रुपये किंमतीचे १८५ मोबाईल चोरुन नेले. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती काढून तपास सुरु आहे. 
शिरोळ, जयसिंगपूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाद्वारे आरोपींचा कसून तपास सुरु आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.