मजबूत
लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांमध्ये जागृती करा
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता हा विषय निवडणूक
आयोगाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध विभागाच्या माध्यमातून 25 जानेवारी
रोजी 10 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांमध्ये जागृती करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात काल राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्या
संदर्भात बैठक झाली. या बैठकीत उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी यावेळी
संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी
म्हणाले, विविध विभागाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवीन मतदारांमध्ये जनजागृती
करण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान केलेल्या
नव मतदार ते ज्येष्ठ मतदार अशा निवडक
मतदारांना बोलावून त्यांचा सन्मान करा. विशेषत:
तृतीयपंथी, दिव्यांग अशा मतदारांनाही निमंत्रित करुन त्यांचाही सन्मान करा.
विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये
विशेषत: महिला मतदार, युवक, नव मतदारांमध्ये निवडणूक जागृती करावी, असेही ते
म्हणाले.
याबैठकीला
तहसिलदार अर्चना शेटे, शीतल मुळे-भांबरे, सुनीता नेर्लीकर आदींसह विविध विभागांचे
अधिकारी उपस्थित होते.
0 0 0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.