शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

जिल्ह्यात 7 ते 21 जानेवारीअखेर महा-रेशीम अभियान



       कोल्हापूर, दि. 3 (जिमाका)  : जिल्ह्यात 7 ते 21 जानेवारी या कालावधीत महा-रेशीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात दि. 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
       या अभियानामध्ये रेशीम शेतीसाठी मनरेगा अंतर्गत गावागावात जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानाचा समूहनिहाय नियोजनाचा आराखडा पुढीलप्रमाणे करवीर तालुका- दि. 8 जानेवारी  रोजी सकाळी 11 ते 5 वा. म्हाळूंगे ग्रामपंचायत हॉल. दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. निगवे खा. ग्रामपंचायत हॉल. दि. 13 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 वा. भूये ग्रामपंचायत हॉल. दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. कुरूकली ग्रामपंचायत हॉल. दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. बेले हनुमान मं. बेले.
       पन्हाळा तालुका -  दि. 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 वा. आरळे ग्रामपंचायत हॉल. दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. कोतोली ग्रामपंचायत हॉल. दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. सोनाळी ग्रामपंचायत हॉल येथे होणार आहे. येथील प्रस्ताववित मार्गदर्शक अधिकारी म्हणून बेले ग्रामसेवक तानाजी बंडू पाटील, भ्रमणध्वनी क्र. 9970221700 व संपर्क अधिकारी क्षेत्र सहाय्यक टी.ए. शिर्के, भ्रमणध्वनी क्र. 8668417814 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
       हातकणंगले तालुका- दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. नरंदे ग्रामपंचायत हॉल. दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 3 वा. मिणचे ग्रामपंचायत हॉल. दि. 13 जानेवारी रोजी सायं. 5 ते 7 वा. कापूरवाडी ग्रामपंचायत हॉल. दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. कुंभोज ग्रामपंचायत हॉल. दि. 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 ते 7 वा. हिंगणगाव ग्रामपंचायत हॉल. दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. दूर्गेवाडी ग्रामपंचायत हॉल. दि. 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 वा. वठार (बूवाचे) ग्रामपंचायत हॉल. दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. खोची ग्रामपंचायत हॉल.
       कागल तालुका - दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. वाळवा खुर्द ग्रामपंचायत हॉल येथे होणार असून यासाठी प्रस्ताववित अधिकारी म्हणून आप्पासो हरिभाऊ झूंझार भ्रमणध्वनी क्र. 7972056205 व संपर्क अधिकारी  वरिष्ठ क्षेत्र सहायक वाय. पाटील भ्रमणध्वनी क्र. 9325294898 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
       गडहिंग्लज तालुका- दि. 7 जानेवारी रोजी  सकाळी 11 ते 5 वा. शेंद्री ग्रामपंचायत हॉल. दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वा. इंचनाळ ग्रामपंचायत हॉल. दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. कडगांव ग्रामपंचायत हॉल. दि. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 रोजी कुमरी ग्रामपंचायत हॉल. दि. 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 वा. सरोळी ग्रामपंचायत हॉल.
       चंदगड तालुका- दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. मुरकूटेवाडी ग्रामपंचायत हॉल. दि. 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 ते 9.30 वा. नागनवाडी ग्रामपंचायत हॉल व दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 वा. हल्लारवाडी ग्रामपंचायत हॉल येथे होणार असून यासाठी विशालसिह फकिरसिह हजेरी, भ्रमणध्वनी क्र. 8806905797 व संपर्क अधिकारी वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक जे.आर. मोरे भ्रमणध्वनी 8554831580 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
           अशा एकूण 25 गावांमध्ये महा-रेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.