कोल्हापूर, दि .19 (जिमाका) : पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या
हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
छत्रपती
प्रमिलाराजे रूग्णालयात सुरूवातीला पालकमंत्री
श्री.पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला
पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन, फित कापून आणि श्रीफळ वाढवून लसीकरण
मोहिमेस प्रारंभ केला. यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकास पल्स पोलिओचा डोस
पाजण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये,
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक विलास देशमुख,
सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.