कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : बालरंगभूमी वृद्धींगत व्हावी यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न केले जातील. शासनाद्वारे या स्पर्धा गेली 17 वर्ष आयोजित केल्या जात आहेत
यामुळे सांस्कृतिक कार्याची वृद्धी होत आहे. नवनवीन कलाकार रंगभूमीला मिळत आहेत.
तसेच बाल रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून भविष्यात रंगभूमीला एक सुजाण
प्रेक्षकवर्ग लाभतोय याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी समाधान
व्यक्त केले.
17
वी राज्य बालनाट्य स्पर्धा आजपासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू झाली. या स्पर्धेचे
उद्घाटन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी संजय
हळदीकर तसेच प्रशांत आयरेकर आणि परीक्षक प्राध्यापक कैलास पोपुलवार तसेच प्रा.
केशव भागवत आणि प्रा अमजद सय्यद हे उपस्थित होते.
यावेळी
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांचा सत्कार समन्वयक प्रशांत जोशी यांच्या हस्ते तर संजय
हळदीकर आणि प्रशांत आयरेकर याबरोबरच तीनही परीक्षकांचा सन्मान आयुक्तांच्या हस्ते
शाल आणि ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. आज स्पर्धेमध्ये वरेरकर नाट्य संगीत
बेळगाव यांचे ईश्वरा या बालनाट्य ने स्पर्धेची सुरुवात झाली. त्यानंतर श्री मथुरा
शिक्षण संस्था इचलकरंजी या संस्थेचे पांडवांची दीदी तसेच यानंतर श्री बालाजी
पब्लिक स्कूल टाकवडे यांचे खेळ हे बालनाट्य आणि श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व
ज्युनियर कॉलेज इचलकरंजी यांचे हालगी सम्राट या बाल नाट्य यांचे सादरीकरण झाले.
यावेळी संजय
जोग, केशवराव भोसले नाट्य गृहाचे व्यवस्थापक समीर महाबरी व उदय माने यांच्यासह बाल
रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. निवेदन पंडित कंदले यांनी केले.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.