इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

राधानगरीचे चार दरवाजे उघडले 7112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग



`           कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : राधानगरी धरण काल 100 टक्के भरल्याने कालपासून 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामधून 7112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे.
            स्वयंचलित प्रत्येक  दरवाजामधून 1428 आणि विद्युत विमोचकातून  1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 10 वाजता 41 फूट 8 इंच असून एकूण 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.32  टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
           पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली व शेळोली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे व जिलजी. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपणी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी असे एकूण 80 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 78.29 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 105.87 इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 2.77  टीएमसी, वारणा 30.08 टीएमसी, दूधगंगा 16.79 टीएमसी, कासारी 2.40 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.37 टीएमसी, पाटगाव 3.09 टीएमसी, चिकोत्रा 1.03 टीएमसी, चित्री 1.71 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.214 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 41.6 फूट, सुर्वे 39 फूट, रुई 69.6 फूट, इचलकरंजी 65 फूट, तेरवाड 56.6 फूट, शिरोळ 58 फूट, नृसिंहवाडी 58 फूट, राजापूर 45  फूट तर नजीकच्या सांगली  34.6 फूट आणि अंकली  39.4  फूट अशी आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.