सोमवार, २३ मार्च, २०२०

14 दिवसांचा कालावधी पूर्ण करणारे 194 संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा - पालकमंत्री सतेज पाटील



       कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : 1189 जणांनी स्क्रीनिंग करुन घेतले आहे. घरी अलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी 194 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात संचारबंदी वाढविली आहे. जिल्ह्यामध्ये त्याची कडक अंमलबजावणी करा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
          *  पुणे, मुंबईहून आलेल्या प्रवाशांनी सी. पी. आर. मध्ये आपली तपासणी 
               करुन घ्यावी.
          * घरामधील अलगीकरण कक्षात असणाऱ्यांनी 14 दिवसांचा कालावधी पुर्ण 
             करावा.
         *  15 हजार मास्क विकत घेणार
          * निर्जंतुकीकरण द्रावणांची 15 हजार बॉटल घेणार
          * ग्रामीण भागात मास्कचा पुरवठा करणार
           
       खासगी वाहतूक बंद राहणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहे. येणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही डॉक्टरने आपली ओपीडी बंद करु नये. स्वत:ची काळजी घेऊन ओपीडी सुरु ठेवावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.