कोल्हापूर, दि. 6
(जि.मा.का.) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेलया पूर्व उच्च
प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8वी) या परीक्षेची
इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची www.mscepune व http://puppss.mscescholarshipexam.in
या संकेतस्थळावर या परीक्षेचे परिक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि
क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती
शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे यांनी दिली.
या अंतरिम उत्तरसुचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येईल. हे ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objections
omInterium Answer Key या हेडींगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता 13 मार्च पर्यंत मुदत देण्यात येत आहे. दि. 13 मार्च नंतरच्या त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलदवारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसुची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरूस्ती करण्याची कार्यपध्दती विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इ.) दुरूस्ती करण्यासाठी दि. 13 मार्चपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही श्रीमती उबाळे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.