गुरुवार, १२ मार्च, २०२०

जलजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम



       कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : जिल्ह्यात दिनांक 16 ते 22 मार्च या जलजागृती सप्ताहानिमित्त कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
            जलजागृती सप्ताहानिमित्त 16 मार्च  रोजी पाटबंधारे विभागाच्यावतीने सकाळी 8.30 ते 10.30  वा. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलकलश पूजन, जल प्रतिज्ञा व जलदिंडी. सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती (तालुके-शाहूवाडी, पन्हाळा.
          17 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वा जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती.  (तालुके-हातकणंगले,शिरोळ).
          18 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती (तालुके-भुदरगड, राधानगरी).
          19 मार्च रोजी सकाळी 11 ते  दुपारी 2 वा. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती तसेच तालुक्याचे ठिकाणी पाणी वापर संस्थांची कार्यशाळा व जलजागृती चर्चासत्रे (तालुके-आजरा, चंदगड).
          20 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वा. जिल्हा मुख्यालयी धावण्याची स्पर्धा (जलजागृती दौड) (सिंचन भवन येथून सुरूवात-सर्किट हाऊस-कसबा बावडा भगवा चौक-मध्यवर्ती शासकीय इमारत -पितळी गणपती मार्गे सिंचन भवन) सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती तसेच तालुक्याचे ठिकाणी पाणी वापर संस्थांची कार्यशाळा व जलजागृती चर्चासत्रे (तालुके-करवीर, गगनबावडा).
          21 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जलजागृतीबाबत व्याख्याने, चर्चासत्रे व जनजागृती तसेच तालुक्याचे ठिकाणी पाणी वापर संस्थांची कार्यशाळा व जलजागृती चर्चासत्रे (तालुके-कागल, गडहिंग्लज).
          22 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जलजागृती सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होईल.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.